zp office.jpg 
छत्रपती संभाजीनगर

का राहणार जिल्हा परिषद कार्यालय संपूर्णपणे बंद...वाचा सविस्तर..

दुर्गादास रणनवरे

औरंगाबाद :  जिल्हा परिषदेतील पंचायत विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला तसेच वित्त विभागातील आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची ची लागण झाल्यामुळे प्रशासनाने संपूर्ण जिल्हा परिषदेतील सर्व  कार्यालय (अत्यावश्यक सेवा वगळून) बुधवार (ता ५) ते शुक्रवार (ता ७) तीन दिवस सर्व दिवस जिल्हा परिषदेतील सर्व विभाग, सर्व कार्यालय अत्यावश्यक सेवा वगळून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

कोरोना बाधित रुग्णांना काजू अन् अक्रोडचा खुराक    
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी याबाबत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचेशी चर्चा करून बुधवार ते शुक्रवार तीन दिवस जिल्हा परिषदेतील सर्व कार्यालय (अत्यावश्यक सेवा वगळून) बंद ठेवण्याचे आदेश मंगळवारी (ता.०४) निर्गमित केले आहेत. जिल्हा परिषद कार्यालय बंद ठेवण्यात येणाऱ्या तीन दिवशीय  कालावधीमध्ये सर्व कार्यालयाचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे.  

तसेच निर्जंतुकीकरणासाठी  प्रत्येक खाते प्रमुखांनी एका जबाबदार कर्मचारी व परिचराची स्वतंत्र आदेश काढून दररोज निर्जंतुकीकरण करून घेण्याची कार्यवाही करावी. असे मंगळवारी काढन्यात आलेल्या आदेशात डॉ. गोंदावले यांनी नमूद केले आहे. 

कोरोना  विषाणूची साखळी तोडण्या करिता तीन दिवस संपूर्ण कार्यालय बंद ठेवण्यात येत असले तरीही या कालावधीमध्ये सर्व खातेप्रमुख व कर्मचाऱ्यांनी वर्क फ्रॉम होम या संकल्पनेनुसार दैनंदिन कामकाज करणे आवश्यक राहील असेही या आदेशात  नमूद करण्यात आले आहे . तसेच या तीनदिवशीय कालावधीमध्ये सर्व खातेप्रमुख यांचे आणि त्यांचे अधिनस्त सर्व कर्मचाऱ्यांचे भ्रमणध्वनी सुरू राहतील याबाबतही प्रत्येक खाते प्रमुखांनी दक्षता घ्यावी असेही या आदेशाद्वारे डॉ गोंदावले यांनी कळविले आहे.

Edit-Pratap Awachar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai BMC Election: भाजपचा उदय, काँग्रेसची घसरण! हिंदुत्वाचा मुद्दा तापवतानाच उत्तर भारतीयांशी सलगी

Nagpur Crime: 'मोहाडीतील महाराष्ट्र बँकेत दरोडा'; १७० ग्रॅम सोने, तीन लाख ६६ हजार घेऊन चोरटे पसार..

Youth Beaten Cigarette : पेटते सिगारेट अंगावर टाकली, जाब विचारायला जाताच तरुणाला चोपला; कोल्हापुरातील घटनेने खळबळ

Stock Market Today : शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात! सोनं-चांदीचा परिणाम; महाराष्ट्र ग्रामीण बँकेसोबत करारामुळे ही कंपनी तेजीत

भक्तांसाठी उघडले 'वैकुंठ द्वार'; मथुरेत लाखोंची गर्दी, जाणून घ्या काय आहे महत्त्व?

SCROLL FOR NEXT